Wednesday, 21 December 2016

बटाट्याचं धिरडं

साहित्य :-
१)      एक वाटी तांदळाचं पीठ
२)     दोन मोठे चमचे बारीक रवा
३)     एक वाटी पाणी
४)     एक वाटी किसलेला बटाटा
५)    एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
६)      एक चमचा हिरव्या मिरचीचे तुकडे
७)    अर्धा चमचा जिरं
८)     चवीनुसार मीठ .
कृती :-
१)      धिरडं करण्यासाठी बीडचा किंवा जाड लोखंडाचा तवा तापत ठेवावा .  सर्व साहित्य   एकजीव करून घ्याव्या . 
२)     तवा तापला की नारळाची शेंडीने तव्याला तेल लावून घ्यावं .  जेणे करून धिरडी चिकटणार नाही .    
३)     एक चमचाभर पीठ घालून पीठ तव्यावर पसरून किंचित तेल सोडून झाकण  ठेवावं .  चर्र आवाज आला की धिरडं उलटावं . 
४)     नीट उलटलं गेलं आणि जरा जाड वाटलं तर थोडं पाणी घाला .  एकदा जमलं की तवाभर धिरडं करता येतं . 

हराभरा कबाब

साहित्य :-
१)      एक वाटी हिरवे हरभरे
२)     अर्धी वाटी कोथिंबीर
३)     एक उकडलेला बटाटा
४)     पाव वाटी पुदिना दोन-तीन मिरच्या
५)    पाच-सहा लसूण पाकळ्या
६)      पाव वाटी बेसन
७)    पाव वाटी किसलेला कांदा
८)     ब्रेडचा चुरा , लिंबूरस
९)      तळण्यासाठी तेल
१०)  चवीनुसार मीठ . 
कृती :-
१)      हरभरे भिजत घालून (ओले असल्यास ताजे) मोड येऊ दयावेत .  नंतर        मीठ आणि लिंबाचा रस घालून प्रेशर कुकर मधून वाफवून घ्यावेत .  
२)     नंतर मिक्सरमध्ये भरड वाटावेत .  बाकी सर्व जिन्नस एकत्र करून        ब्रेडच्या चुऱ्यामध्ये घोळवून तळावेत .  पुदिन्याची चटणी किंवा सॉसबरोबर   खायला दयावे .  

शेवयांचा उपमा

साहित्य :-
१)      दीड कप शेवया (शक्यतो जाड)
२)     एक कांदा बारीक चिरून
३)     एक टोमाटो बारीक चिरून
४)     चार कप पाणी , भोपळी मिरची
५)    श्रावणघेवडा आणि गाजर (बारीक चिरून)
६)      मटार – प्रत्येकी पाव वाटी
७)    दोन मिरच्या लांब तुकडे करून
८)     अर्धा चमचा किसलेलं आलं
९)      दहा-बारा कढीलिंबाची पानं
१०)  एक चमचा लिंबूरस
११)   साखर , दोन मोठे चमचे तेल
१२)  मोहरी , हिंग , जिरं
१३)  ओलं खोबरं , कोथिंबीर
१४) चवीनुसार मीठ .
कृती :-
१)      प्रथम चार कप पाणी उकळायला ठेवावं .  त्यात चिमुटभर मीठ घालावं .
२)     पाणी खळखळून उकळलं की शेवया टाकव्या .  शेवया शिजल्या की चाळणीतून पाणी काढून निथळून घ्याव्यात .
३)     कढाईत तेल घालावं .  त्यात मोहरी , जिरं , कढीपत्ता , आलं-मिरच्या घालून थोडं परतल्यावर त्यात प्रथम कांदा घालावा .
४)     कांदा पारदर्शी झाल्यावर श्रावण घेवडा , गाजर आणि मटार (प्रथम या भाज्या थोडया वाफवून घ्याव्यात) टाकाव्यात .
५)    नंतर भोपळी मिरची घालावी .  शेवटी शेवया घालाव्यात .  मीठ , साखर , लिंबूरस घालून हातानं ढवळावं .
६)      गैस मंद करून झाकण ठेवून एक वाफ दयावी .  लगेच बंद करावं .  वरून खोबरं आणि कोथिंबीर पेरावी .

                              semiya upma

वरी तांदुळाची खिचडी

साहित्य :-
१)      एक वाटी वरी तांदूळ
२)     दोन मोठा चमचा तूप
३)     दीड मोठा चमचा जिरं
४)     तीन-चार लाल सुक्या मिरच्या
५)    अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
६)      चवीला मीठ .
कृती :-
१)      वरी तांदूळ धुऊन , निथळून कोरडे भाजून घ्यावे .
२)     तुपाची फोडणी करून जिरं , मिरच्या घालून त्यावर भरलेले तांदूळ , फोडणी , शेंगदाण्याचा कूट , मीठ घालून नीट एकत्र करून डब्यात भरून ठेवावे .
३)     खिचडी करायच्या वेळी एक वाटी मिश्रणाला पाऊण वाटी उकळत पाणी घालून एक वाफ आणावी .
मायक्रोवेव्हमध्ये दोन-तीन मिनिटात शिजते .  दोन-तीन प्लेट खिचडी होते .

                             vari tandul khichdi

लस्सी

साहित्य:
 जाडसर थंड दही
 ताजी जाड मलई (फ्रेश क्रीम)
टीस्पून मीठ
साखर चवीप्रमाणे
सजावटीसाठी पुदिन्याची पाने
कृती:
१. दही,मलई,साखर आणि मीठ एकत्र करून ब्लेंडर वर छान घुसळून घ्या.
२. लस्सी ग्लास मध्ये फुटभर उंचीवरून ओता म्हणजे वरती मस्त जाड फेस तयार होईल.
३. त्यावर पुदिन्याची पाने घालून तासभर फ्रीज मध्ये ठेवा आणि थंडगार सर्व्ह करा.
Mango-Lassi123

बटाटा पोहे कटलेट

साहित्य:-
 अर्धा किलो बटाटे
पाव किलो जाड पोहे 
४-५ ब्रेड  स्लाइस
चवीनुसार मीठ

आले-मिरची पेस्ट
तळण्यासाठी तेल                                                    

कृती:-

१. बटाटे उकडून कुस्करून घ्यावे.
२.ब्रेड मिक्सरला लावून बारीक चुरा करावा.
३.पोहे पाण्यात भिजवून निथळत ठेवावे.
४.आता बटाटे,ब्रेडचा चुरा,पोहे ह्यात मीठ आले-लसूण पेस्ट घालून नीट मिक्स करावे.

५.लिंबा एवढे गोळे करून तेलात मंद आचेवर तळावे.